मारूळला कबूतरबाजीचे पर्यवसान हाणामारीत

By Admin | Updated: October 2, 2015 00:19 IST2015-10-02T00:19:14+5:302015-10-02T00:19:14+5:30

फैजपूर : लहान मुलांच्या कबूतर उडविण्याच्या कारणावरून मोठय़ांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही घटना मारूळ ता.यावल येथे गुरुवारी घडली. त्यात 15 जण जखमी झाले.

Due to the Dowry of Marul | मारूळला कबूतरबाजीचे पर्यवसान हाणामारीत

मारूळला कबूतरबाजीचे पर्यवसान हाणामारीत

फैजपूर : लहान मुलांच्या कबूतर उडविण्याच्या कारणावरून मोठय़ांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही घटना मारूळ ता.यावल येथे गुरुवारी दुपारी चार ते पाच वाजेदरम्यान घडली. दोन गटात तुफान हाणामारी होऊन त्यात 15 जण जखमी झाले. हाणामारीत लाठय़ा-काठय़ा, सुरे, कु:हाडीचा सर्रास वापर झाला. घटनेची माहिती समजताच मारूळ येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. रात्री उशिरार्पयत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. 30 रोजी कबूतर उडविण्याच्या कारणावरून व रस्त्याच्या वादावरून लहान मुलांमध्ये वाद झाला. वादात मोठय़ांनी उडी घेतली. सैयद इलियास अली व रशीद मजहर अली यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. सायंकाळी प्रकरणावर पडदा पडला असे वाटत असताना गुरुवारी, 1 रोजी सायंकाळी पुन्हा याच कारणावरून तुफान हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटांकडून सर्रास लाठय़ा-काठय़ा, सुरे, कु:हाडीचा वापर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, फौजदार मनोहर मोरे, रमेश मानकर व सहका:यांनी मारूळ येथे जाऊन शांतता प्रस्थापित केली. रात्री उशिरार्पयत गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Due to the Dowry of Marul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.