सुसरीत डोहात बुडून दोन मुलांचा मृत्यू

By Admin | Updated: July 30, 2016 18:50 IST2016-07-30T18:50:33+5:302016-07-30T18:50:33+5:30

सुसरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोघा 11 वर्षीय चिमुरडय़ांचा शेततळ्यात बुडाल्याने करुण अंत झाला

Due to the death of two children in the well-equipped dough | सुसरीत डोहात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सुसरीत डोहात बुडून दोन मुलांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत - 
वरणगाव, दि. 30 - तालुक्यातील सुसरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोघा 11 वर्षीय चिमुरडय़ांचा शेततळ्यात बुडाल्याने करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतकरी जैन यांच्या शेतात ही दुर्देवी घटना घडली़
गौरव अशोक तळेले (11) व नितीन लक्ष्मण पाटील (11) अशी मयत मुलांची नावे आहेत.
 
सुसरी येथील काही लहान मुले शनिवारी दुपारी गावाजवळील एका शेततळ्यावर पोहण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही मुले बुडाली. ही घटना पाहताच त्यांच्यासोबत आलेल्या मुलांनी गावाकडे पळत जावून आरडा-ओरड केली.  शिवाजी ठोसर, संदीप पाटील, विक्रम कोळी आदींनी शेततळ्यात उडय़ा घेत मुलांना बाहेर काढले. मात्र तत्पूर्वीच या मुलांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Due to the death of two children in the well-equipped dough