वाकोद येथे जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर

By Admin | Updated: July 3, 2017 12:38 IST2017-07-03T12:38:22+5:302017-07-03T12:38:22+5:30

कुटुंब घरात झोपले असल्याने जीवित हानी टळली

Due to the dead power star got up at Wakod | वाकोद येथे जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर

वाकोद येथे जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर

 ऑनलाईन लोकमत

वाकोद, ता. जामनेर ,दि.3  येथून जवळच असलेल्या कुंभारी धरणाजवळ लोंबकळणा:या जीर्ण वीज तारांनी शेतक:याचा बळी घेतल्यानंतर या वीज तारांची स्थिती वाकोदसह परिसरात जशीच्या तशी आहे. दरम्यान, शनिवारी रात्री वाडी परिसरातील हनुमाननगरात जीर्ण विद्युत तार तुटून घराच्या अंगणात कोसळली. सुदैवाने त्यात जीवित हानी टळली आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
लोंबकळणा:या व जीर्ण विद्युत  तारांमुळे जीवित हानी होण्याचा धोका कायम असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून वेळोवेळी मांडण्यात आले आहे. तसेच वाकोद व परिसरात ठिकठिकाणी  वीज वाहक तारा मोठय़ा प्रमाणावर जीर्ण व खराब झालेल्या असून, वेळोवेळी गावातून तक्रारी देवूनदेखील वीज वीज कंपनीला जाग येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
शनिवारी रात्री पाऊस, वारा, वादळ नसतानादेखील वाडी परिसरातील हनुमाननगरमध्ये वीज प्रवाह असलेली जीर्ण तार अचानक गोरख चव्हाण यांच्या घराच्या अंगणात कोसळली.
याआधी पावसाचे चित्र असल्याने या कुटुंबाने घराबाहेर झोपणे टाळले. अन्यथा अंगणात जेथे झोपतात तेथेच हे तार पडले सुदैवाने हे संकट टळले. ही बाब निदर्शनास येताच वस्तीतील नागरिकांनी तत्काळ तुटलेल्या ताराचा वीज प्रवाह बंद केला. या हनुमानमंदिर परिसरात सुनील जोशी, बद्री जोशी, गोरख चव्हाण, कैलास जोशी, भीमराव जोशी, अनिल कुंभार, चंद्रभान जोशी या रहिवाशांच्या घरावरुन या जीर्ण तार गेल्या आहेत. अनेक वेळा या तारा तुटून पडतात. या घरांमध्ये लहान  मुले घराबाहेर फिरत असतात. अचानक अंगावर पडल्यास अनर्थ घडू शकतो. या वस्तीत राहणा:या सुनील जोशी यांच्या घरात दोन दिवसांपूर्वी अचानक विज प्रवाह उतरला होता. या तारांचा स्पर्श घरांला होत असल्याने खासगी वायरमन बोलावून दुरुस्त करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी तक्रार देवूनदेखील वीज वितरण कंपनी च्या अधिकारी व कर्मचारी यांना कोणतेच सोयरेसुतक नसल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Due to the dead power star got up at Wakod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.