खांबात वीज प्रवाह उतरल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:32+5:302021-07-22T04:12:32+5:30
भुसावळ : वराडसीम जोगलखोरी शिवारातील घटना फोटो भुसावळ : वीज खांब्यात वीज प्रवाह उतरल्याने एक गाय आणि एका महिलेचा ...

खांबात वीज प्रवाह उतरल्याने
भुसावळ : वराडसीम जोगलखोरी शिवारातील घटना
फोटो
भुसावळ : वीज खांब्यात वीज प्रवाह उतरल्याने एक गाय आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वराडसीम-जोगलखोरी शिवारात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
कमलबाई सुरेश पाटील (५५) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या मुलगा गजानन पाटील आणि सून शीतल यांच्यासोबत राहतात. बुधवार सकाळी चराईसाठी सोडलेल्या गाईला धरण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी गाय खांब्याजवळ गेली असता तिला विजेचा शॉक बसला. गाईची सुटका व्हावी
म्हणून प्रयत्न करीत असतानाच कमलबाई यांनाही शॉक लागला आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत भुसावळ तालुका पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. तालुका पोलिस युनूस शेख व राजेश पवार यांनी पंचनामा केला.