आॅनलाईन लोकमतअमळनेर- तालुक्यातील गडखांब मांजरडी येथील ज्ञानेश्वर अरुण पाटील याच्या गळ्यावर हल्लेखोराने ब्लेड ने वार करीत जखमी केले. डॉक्टरांनी ३० टाके टाकल्याने तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरूद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेअमळनेर तालुक्यातील गडखांब येथील ज्ञानेश्वर अरुण पाटील हे आपल्या मित्रांसोबत चौकात गप्पा मारत होते. या दरम्यान दीपक सुनील संदानशिव याने अचानक ज्ञानेश्वर यांच्या गळ्यावर समोरून ब्लेड ने वार केला. काही वेळ कुणाला काहीच समजले नाही, पण गळ्यातून रक्त येऊ लागल्याने सर्वच घाबरले. पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल व ग्रामस्थांनी जखमी ज्ञानेश्वर याला खाजगी वाहनाने डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा फौंडेशन मध्ये दाखल केले. त्यांच्या गळ्याला ३० टाके टाकण्यात आले. सुदैवाने श्वास नलिकेपर्यंत वार न पोहोचल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेनंतर आरोपी दीपक संदनशिव यावर काही ग्रामस्थांनी पाळत ठेवली होती. पोलीस निरीक्षक विकास वाघ व पोलीस कर्मचारी विजय साळुंखे व रवींद्र पाटील यांनी आरोपीला गडखांब व मांजरडी पोलीस पाटलांच्या मदतीने ताब्यात घेतले. याप्रकरणी अरुण दगा पाटील यांच्या फियार्दीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला दीपक संदनशिव याच्याविरुद्ध भादंवि ३०७ प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
ब्लेडच्या वार मुळे गळ्यावर ३० टाके पडूनही गडखांबचा तरुण सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 17:35 IST
अमळनेर तालुक्यातील प्राणघातक हल्लाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
ब्लेडच्या वार मुळे गळ्यावर ३० टाके पडूनही गडखांबचा तरुण सुखरुप
ठळक मुद्देमित्रांसोबत गप्पा मारत असताना केला ब्लेडने वारडॉक्टरांनी तरुणाच्या जखमेवर टाकले ३० टाके.पोलिसांनी केली संशयित आरोपी दीपक संदानशिव याला अटक