पिंपळगावात लस मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:48 IST2017-07-18T15:48:09+5:302017-07-18T15:48:09+5:30
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस मिळत नसल्याने ग्रामस्थ व रुग्णांनी मंगळवारी सकाळी संताप व्यक्त केला.

पिंपळगावात लस मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संताप
ऑनलाईन लोकमत
भुसावळ/वरणगाव,दि.18-भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस मिळत नसल्याने ग्रामस्थ व रुग्णांनी मंगळवारी सकाळी संताप व्यक्त केला.
सध्या पावसाळा सुरू आहे. साथीचे आजार वाढत आहेत. त्यामुळे लसीकरण करणे आवश्यक आहे, असे असताना लस असून ती मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करीत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, केंद्रात लस आहे, मात्र संबंधित लिपिक ती कपाटात ठेऊन व त्याची चावी सोबत घेऊन आठ दिवस सुटीवर गेला असल्याचे सांगण्यात आले.