चोपड्यात जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 23:05 IST2019-09-29T23:05:44+5:302019-09-29T23:05:49+5:30

चोपडा : ३० हजारांचा ऐवज जप्त, नऊ जणांवर गुन्हा

Ducks raid on gambling grounds | चोपड्यात जुगार अड्ड्यावर धाड

चोपड्यात जुगार अड्ड्यावर धाड



चोपडा : शहरात रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी रामपुरा भागातील पत्त्यांच्या अड्ड्यावर धाड टाकली. यात नऊ जण पत्ते खेळताना आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने रामपुरा भागातील पत्त्यांच्या अड्ड्यावर धाड टाकली. तेव्हा जुगार खेलताना आढलेल्या नऊ जणांकडे मोबाईलसह रोकड असा ३० हजारांचा ऐवज ताब्यात घेतला.
संशयित आरोपींमध्ये शेख रशीद शेख इस्माईल (वय ५०, रामपुरा) शेख उमर शेख हुसेन (४९, समतानगर), शेख इमरान शेख रशीद (३०, रामपुरा), विनोद शिवराम वाडे (२८, आंबेडकर नगर), परशुराम सुखदेव करकाळ (३२, पंचशील नगर), रोहिदास अमृत साळुंखे (४६, पारधीवाडा) तर शेख रशीद शेख इस्माईल यांनी पळून गेलेल्या संशयितांची नावे सांगितल्यानुसार पोलिसांनी संजय शिवाजी पाटील (रामपुरा), राहुल अशोक महाजन (माळीवाडा), मनोज काशिनाथ पारधी (रामपुरा) आदी संशयित आरोपींची नावे कळविली आहेत. धाड टाकणाऱ्या पथकात सहाय्यक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस नाईक विलास सोनवणे, रत्नमाला शिरसाठ, प्रकाश मथुरे, श्याम पवार आदींचा समावेश होता.

 

 

Web Title: Ducks raid on gambling grounds