सुकी नदीला आला मोठा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 23:05 IST2020-09-13T23:04:11+5:302020-09-13T23:05:46+5:30
सावखेडा येथून जवळच असलेल्या सुकी नदीला रविवारी सायंकाळी मोठा पूर आला.

सुकी नदीला आला मोठा पूर
सावखेडा, ता.रावेर : सावखेडा येथून जवळच असलेल्या सुकी नदीला रविवारी सायंकाळी मोठा पूर आला. डोंगराळ भागात सायंकाळी झालेल्या पावसामुळे सुकी नदीला मोठा पूर आला होता, मात्र परिसरांमध्ये कुठे पाऊस नसल्याने मोठा पूर आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.
अचानक आलेल्या मोठा पुरामुळे परिसरातील एकच चर्चा रंगली. आपल्याकडे पाऊस पडत नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्याने सगळ्यांना आश्चयार्चा धक्का बसला. यामुळे परिसरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या मोठा पुरामुळे शेतकऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.