भुसावळात गुन्हेगारांवर आता ड्रोनची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:43+5:302021-09-09T04:21:43+5:30
भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी मनोज अशोक साळुंके यास अटक केली. २० जणांना तालुकाबंदी २० जणांना तालुका ...

भुसावळात गुन्हेगारांवर आता ड्रोनची नजर
भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी मनोज अशोक साळुंके यास अटक केली.
२० जणांना तालुकाबंदी
२० जणांना तालुका बंदीचे आदेश गणेशोत्सवानिमित्त प्रांताधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. त्यासंदर्भातील आदेश तातडीने बजावण्यात आले आहेत. आदेशात नमूद केलेल्या व्यक्तींना भुसावळ शहर व भुसावळ तालुका महसूल सीमेच्या हद्दीमध्ये ९ ते २९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
२३ जणांना समन्स बजावण्यात आले. ६ जणांना बेलेबल वॉरंट बजावले. ३ नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले.
वाहनांची तपासणी
रात्री उशिरा फिरणाऱ्या ६१ वाहनांची तपासणी शहरात रात्री नाकाबंदी करून करण्यात आली. यात १ संशयित वाहन मिळून आले. त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १२४ प्रमाणे कारवाई करून गुन्हा नोंद केला. तर ३४ हिस्ट्री सीटर चेक केले. त्यापैकी २१ मिळाले त्यांना चांगल्या वर्तनाची समज दिली.
अभिलेखावरील अवैध शस्त्र बाळगणारे १२ गुन्हेगार चेक केले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस निरीक्षक शेंडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक दूनगहू, साहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक गोटला, साहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी त्याचप्रमाणे भुसावळ शहर व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी केली.