पहूरचा चालक सेंधव्याजवळील अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 21:44 IST2019-09-16T21:44:45+5:302019-09-16T21:44:58+5:30
पहूर, ता.जामनेर : पेठमधील रहिवासी शिवाजी सुकदेव तेली (४५) यांचा मध्य प्रदेशातील सेंधव्याजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ...

पहूरचा चालक सेंधव्याजवळील अपघातात ठार
पहूर, ता.जामनेर : पेठमधील रहिवासी शिवाजी सुकदेव तेली (४५) यांचा मध्य प्रदेशातील सेंधव्याजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडलीे.
नातेवाईकांकडून प्राप्त माहितीनुसार, शिवाजी तेली हे भाजीपाला गाडीवरील चालक आहे. ते भाजीपाला गाडी घेऊन रविवारी रात्री सेंधव्याकडे रवाना झाले होते.
सेंंधव्याजवळील एका ठिकाणी गाडी उभी करून काही कामानिमित्त पायी चालताना शिवाजी याला एका वाहनाने उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात शिवाजी तेली याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या पत्नीसह आईला याची माहिती कळू दिली नाही. म्रुतदेह पहूर येथे आणण्यासाठी नातेवाईक खंडव्याकडे रवाना होऊन रात्री उशिरापर्यंत म्रुतदेह आलेला नव्हता. पश्चात दोन मुले, मुलगी, पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे. शिवाजी तेली यांनी जळगाव-पुणे या खाजगी बसवरही चालक म्हणून काम केले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.