बंदूकीचा धाक दाखवित औरंगाबाद रस्त्यावर चालकाला लूटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:03 IST2017-09-12T17:03:09+5:302017-09-12T17:03:09+5:30

जळगाव पोलिसांनी संशयितास देशी कट्टयासह घेतले ताब्यात

The driver of the gunny robbery robbed the driver on the road in Aurangabad | बंदूकीचा धाक दाखवित औरंगाबाद रस्त्यावर चालकाला लूटले

बंदूकीचा धाक दाखवित औरंगाबाद रस्त्यावर चालकाला लूटले

ठळक मुद्देसुनसगाव फाटय़ाजवळ मध्यरात्री बंदूकीचा धाक दाखवित केली रस्तालुटचालकाजवळील चार हजार रुपये व मोबाईल लांबविलाघटनेनंतर पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी करीत संशयितास घेतले ताब्यात.

ऑनलाईन लोकमत

जामनेर,दि.12 - जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील सुनसगाव फाटय़ाजवळ नादुरुस्त चारचाकीची दुरुस्ती करणा:या चालकास बंदूकीचा धाक दाखवित त्याच्याकडून 4 हजार रुपये रोख व मोबाईल लुटून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयित भूषण उर्फ जिगर रमेश बोंडरे (रा.उमाळा, ता.जळगाव) याला ताब्यात घेतले आहे.

सुनसगाव फाटय़ाजवळ सोमवारी रात्री नादुरुस्त ट्रकची एक चालक दुरुस्ती करीत होता.या दरम्यान अज्ञात आरोपीने बंदूकीचा धाक दाखवित त्याच्याकडील चार हजार रुपये व मोबाईल लुटून नेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नजीर शेख, उपनिरीक्षक विकास पाटील, पाचोरा विभागाचे उपअधीक्षक केशव पातोंड व म्हसावद दूरक्षेत्रच्या कर्मचा:यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी रात्रीच नाकाबंदी करीत संशयितांचा शोध सुरु केला.   मंगळवारी सकाळी पोलिसांनी जळगाव विमानतळाजवळून संशयित भूषण उर्फ जिगर रमेश बोंडरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस त्याच्या दुस:या साथीदाराचा शोध घेत आहेत. भूषण हा गेल्या दोन महिन्यांपासून म्हसावद येथे भाडय़ाची खोली घेऊन राहत आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: The driver of the gunny robbery robbed the driver on the road in Aurangabad