ट्रक ट्रॅक्टरवर आदळून चालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 2, 2017 13:44 IST2017-06-02T13:44:21+5:302017-06-02T13:44:21+5:30
मैद्याने भरलेला ट्रक समोरून येणा:या ट्रॅक्टरवर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला़
ट्रक ट्रॅक्टरवर आदळून चालकाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.2- प्रादेशिक परिवहन विभागाचा नाका चुकवून आडमार्गाने वाहतूक करीत असलेला व मैद्याने भरलेला ट्रक समोरून येणा:या ट्रॅक्टरवर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला़ शुक्रवारी सकाळी 11़30 वाजता हा अपघात कोठे गावाजवळ झाला़
खंडवा(मध्यप्रदेश) येथून मैदा भरून मुक्ताईनगरकडे येणारा निघालेला ट्रक (क्ऱएम़एच ़43 वाय़0435) पुरनाड परिवहन विभागाचा तपासणी नाका चुकवून चोरटी वाहतूक करीत असताना कोठे गावालगत शेतातून पिंप्रीनांदू येथे घराकडे जाणारा ट्रॅक्टर (क्र ़एम़एच 19़-8132) यावर पलटी झाला़ या अपघातात ट्रॅक्टर चालक अखिलेश भास्कर पाटील (25, पिंप्रीनांदू, ता़ मुक्ताईनगर) हा जागीच ठार झाला तर ट्रॅक्टर पूर्णपणे चक्काचूर झाला़