पावसाळ्यात पाणी उकळूनच प्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:28+5:302021-08-20T04:21:28+5:30
न्यूमोनियाचे रुग्ण अधिक प्रमाणात येत आहेत. त्यातही गंभीर अवस्थेत अधिक मुले दाखल होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्यांची संख्याच ...

पावसाळ्यात पाणी उकळूनच प्यावे
न्यूमोनियाचे रुग्ण अधिक प्रमाणात येत आहेत. त्यातही गंभीर अवस्थेत अधिक मुले दाखल होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्यांची संख्याच एवढी असेल तर ग्रामीण भागात व खासगी रुग्णालयांमध्ये ही संख्या वाढलेली असेल. मलेरियाचे प्रमाणही एकत्रित वाढलेले आहे. अशा स्थितीत पालकांनी लहान मुलांचे मच्छरांपासून संरक्षण होण्यासाठी काळजी घ्यावी, डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेणे या दिवसात गरजेचे आहे. पाणी हे नियमित उकळूनच प्यावे. - डॉ. बाळासाहेब सुरोसे, बालरोगतज्ज्ञ, जीएमसी
..ही घ्या काळजी
१ या दिवसात पाणी उकळूनच प्यावे, आहारावर विशेष लक्ष द्यावे, शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये.
२ मच्छरांपासून लहान मुलांचा बचाव होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मच्छरदानी वापरावी, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
३ कुठलाही आजार अंगावर काढू नका, तातडीने योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डेंग्यपासून बचाव म्हणून कोरडा दिवस पाळा.