अपघाती मृत्यूने नोकरीचे स्वप्न अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 13:11 IST2017-08-09T13:10:01+5:302017-08-09T13:11:11+5:30
दुदैर्वी मृत्यू : महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अपघाती मृत्यूने नोकरीचे स्वप्न अपूर्ण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - आयटीआय झाल्यानंतर भुसावळ येथे वीज उपकेंद्रामध्ये शिकाऊ उमेदवारी (अॅप्रेंटीस) करणारा कल्पेश दिलीप कापडणे (22, रा. अनोरे, ता. धरणगाव) हा तरुण दुचाकीने कामावर जात असताना ट्रकने धडक दिल्याने जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी 9 वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पाळधी गावानजीक घडला. शिकाऊ उमेदवारीनंतर नोकरी लागणार असल्याने हा तरुण मेहतीने काम करीत होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
कल्पेश कापडणे याने वीजतंत्री (इलेट्रीशियन) हा ट्रेड केला व तीन महिन्यापूर्वीच तो भुसावळ येथे शिकाऊ उमेदवार म्हणून लागला. दररोज तो रेल्वेने ये-जा करीत असे. मात्र दोन दिवसांपासूनच तो दुचाकीवर जाऊ लागला. त्यानुसार बुधवारी सकाळी तो अनोरे येथून भुसावळला जायला निघाला. पाळधी नजीक आल्यानंतर त्याला ट्रकने जोरदार धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. अपघातानंर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.