शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या लोककलावंत निवड समितीवर डॉ.सत्यजित साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:37 IST

जळगाव :  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून लोककलावंत निवडीसाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर ...

जळगाव :  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून लोककलावंत निवडीसाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील गरजू- गरीब लोक कलावंत निवडीसाठी डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सत्यजित साळवे यांची सदर समितीवर निवड करण्यात आली.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. सत्यजित साळवे संचालक असताना  सन 2015 ते 2020 या काळात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अनुदान दिलेला "महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोककलांचे सर्वेक्षण व अभ्यास" या बृहद संशोधन प्रकल्पाद्वारे त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील लोक कलावंतांची  व लोककलांची माहिती संकलित करून शासनाला सादर केली आहे.

कोरोना काळात आर्थिक विवंचनेनेला सामोरे जाणाऱ्या असंघटित अर्थात एकल लोककलावंतांची झालेली उपासमार लक्षात घेता त्या लोककलावंतांना मानधन देण्याचे शासनाने ठरवले आहे. या कोरोना काळात कोरोना संबंधित जनजागृती, लसीकरण या संदर्भातील जनजागृती इत्यादी कार्यक्रम सदर लोक कलावंतांकडून गाव खेडे वाड्या-वस्त्या येथे गल्लोगल्ली सादर करून त्या कार्यक्रमांचे मानधन रुपये 5000 लोककलावंतांना शासनातर्फे देण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या लोक कलावंत निवड समितीवर डॉ. सत्यजित साळवे यांची निवड झाल्याबद्दल प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन, प्र-कुलगुरू डॉ बी.व्ही.पवार ,प्रभारी कुलसचिव डॉ.ए.बी. चौधरी तसेच लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे व प्राध्यापक- शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.

लोक कलावंतांना आवाहनजळगाव,धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील कोरोना काळात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अस्सल आणि गरीब- गरजू एकल अथवा तीनच्या गटाने लोककला अर्थात वासुदेव, गोंधळी, कलगीतुरा, भारुड, वाघ्या& मुरळी, पोतराज ,सोंगाड्या पार्टी, आंबेडकरी जलसे सादर करणाऱ्या लोककलावंतांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक कलाप्रकार ,व कलाप्रकार सादरीकरणाचा पुरावा इ. माहिती प्रा.डॉ.सत्यजित साळवे (मो.क्र. 98 233 80 970) या क्रमांकावर व्हाट्सअप करून आपली नोंदणी करावी.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव