कठोऱ्यात डॉ. सत्त्वशील जाधव यांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:30+5:302021-01-19T04:19:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव...... तालुक्यातील कठोरा येथील ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत लोकसेवा शेतकरी पॅनलचे प्रमुख डॉ. सत्त्वशील जाधव ...

Dr. hard. Defeat of Sattvasheel Jadhav | कठोऱ्यात डॉ. सत्त्वशील जाधव यांचा पराभव

कठोऱ्यात डॉ. सत्त्वशील जाधव यांचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव...... तालुक्यातील कठोरा येथील ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत लोकसेवा शेतकरी पॅनलचे प्रमुख डॉ. सत्त्वशील जाधव यांचा अवघ्या १० मतांनी धक्कादायक पराभव झाला आहे. माजी सरपंच जितेंद्र पाटील यांनी त्यांचा पराभव केला. डॉ. जाधव यांच्या पॅनलने बहुमत प्राप्त केले असले तरी त्यांचा पराभवामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ या म्हणींचा प्रत्यय येत आहे. या ठिकाणी जितेंद्र पाटील यांच्या ग्रामविकास व डॉ. सत्त्वशील जाधव यांच्या लोकसेवा शेतकरी पॅनलमध्ये चुरस होती. यामध्ये ग्रामविकास पॅनलला ३ तर लोकसेवा शेतकरी पॅनलच्या ४ जागांवर विजय प्राप्त केला.

वॉर्ड - १

विकास देवराम बोरसे - १९६

सरला समाधान सपकाळे - २११

योगनाबाई विश्वनाथ पाटील - २३६

वॉर्ड २

कविता समाधान पाटील - १३२

अरुण प्रल्हाद सपकाळे - १२३

वॉर्ड ३

सुरेखा जितेंद्र पाटील - १५१

रेखा लक्ष्मण सपकाळे - १६२

Web Title: Dr. hard. Defeat of Sattvasheel Jadhav