डॉ. उल्हास पाटील नर्सिंग महाविद्यालयसह गोदावरीत महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST2020-12-08T04:14:16+5:302020-12-08T04:14:16+5:30

जळगाव : डॉ. उल्हास पाटील नर्सिंग महाविद्यालयसह गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ...

Dr. Greetings to Ulhas Patil Nursing College and Godavari Mahamanwala | डॉ. उल्हास पाटील नर्सिंग महाविद्यालयसह गोदावरीत महामानवाला अभिवादन

डॉ. उल्हास पाटील नर्सिंग महाविद्यालयसह गोदावरीत महामानवाला अभिवादन

जळगाव : डॉ. उल्हास पाटील नर्सिंग महाविद्यालयसह गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

नर्सिंग महाविद्यालयात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.रवींद्र पुराणिक, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, प्रवीण कोल्हे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात अ‍ॅड. सतीश गाडगे, प्रा. अ‍ॅड नयना झोपे, ग्रंथपाल मनिषा इंगळे, प्रदीप महाजन, विनोद धांडे, गोविंदा कावळे आदींनी महामानवाला अभिवादन केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात अधिष्टाता डॉ.एन.एस.आर्विकर यांच्यासह कर्मचारी, डॉक्टर्स उपस्थित होते. तसेच फाउंडेशन अंतर्गत विविध शैक्षणिक महाविद्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयात प्राचार्य डॉ.डी. बी. पाटील, फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात डॉ. एस. एम. पाटील, गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. व्ही.एच. पाटील, उपप्राचार्य प्रवीण फालक, गोदावरी आयएमआरमध्ये डॉ. प्रशांत वारके, फॅशन महाविद्यालयात उज्ज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात पद्मजा नेवे, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्यासह कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Web Title: Dr. Greetings to Ulhas Patil Nursing College and Godavari Mahamanwala