डॉ. अण्णा भाऊ साठे उत्सव समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:16+5:302021-07-07T04:20:16+5:30

भुसावळ : शहरातील साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृहात सोमवारी भुसावळ ...

Dr. Establishment of Anna Bhau Sathe Utsav Samiti | डॉ. अण्णा भाऊ साठे उत्सव समितीची स्थापना

डॉ. अण्णा भाऊ साठे उत्सव समितीची स्थापना

भुसावळ : शहरातील साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृहात सोमवारी भुसावळ नगर उत्सव समितीची स्थापना करण्यात आली.

समितीच्या अध्यक्षपदी भीम आर्मीचे भुसावळ तालुकाध्यक्ष विकास वनकर यांची एकमताने निवड करण्यात आली, तर विजय वानखेडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

बैठकीस मातंग समाज व भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिटचे सर्व सदस्य उपस्थित होते. या सभेत सहभागी झालेल्या बहुजन समाजातील सर्व पुरुषांच्या विचारसरणीने वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट व समस्त मातंग समाज यांनी जामनेर रोडवरील नवशक्ती संकुलासमोर दुभाजकाजवळ साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Web Title: Dr. Establishment of Anna Bhau Sathe Utsav Samiti