शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
2
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”
3
१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 
4
आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल
5
वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या
6
LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब
7
अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...
8
“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल
9
मला वाटते ५ वेळच्या नमाजपेक्षा...; फराह खानने प्रश्न विचारणाऱ्या चाहतीला दिले असे उत्तर...
10
विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी
11
अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ
13
बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!
14
"मी माझ्या आईची हत्या..."; कोलकात्यात तरुणाने आईला चाकूने मारले, मृतदेहासोबत रात्र घालवली; चहा विक्रेत्यासमोर गुन्हा कबूल केला
15
लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'
16
उद्या सुट्टी आहेच, आज रात्री आकाशाकडे डोळे लावून बसा...; चंद्र गुलाबी होणार, ही आहे वेळ...
17
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर गोंधळ घालू लागले; ग्राहक वीज मंडळाचे उंबरे झिजवू लागले
18
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; जप्त केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली
19
नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी
20
“अल्पावधीत ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले”; उद्धवसेनेच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:00 IST

पत्रपरिषद : प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांची माहिती

जळगाव- शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली असल्याची माहिती शनिवारी प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी, उपप्राचार्य डॉ. बी.पी.सावखेडकर, आर.एन.महाजन, प्रा. एन.एस.पाटील, डॉ.जे.डी. लेकुरवाडे व संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.बैंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यमापन आणि प्रमाणिकरण संस्था अर्थात नॅक मार्फत १८ ते १९ जुलै २०१९ रोजी माजी कुलगुरू प्रा.डॉ.मणिमाला दास यांच्या अध्यक्षतेखाली पीअर टीमकडून महाविद्यालयास भेट देण्यात आली होती.या पथकामध्ये माजी हंगामी कुलगुरू व विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शिवा हुराकडली आणि थिरूमंगलम येथील कला, विज्ञान महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ. राजेश्वरी राव यांचा समावेश होता. या पथकाकडून महाविद्यालयातील विषय विभाग, प्रयोग शाळा, कार्यशाळा तसेच हस्तकला प्रदर्शनीत रूचिरा, स्पर्धा परीक्षा केंद्र, एफटी टू इन्स्टीट्युट, एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी कल्याण विभागांना भेटी देऊन तपासणी केली होती. सोबच महाविद्यालयाकडून विद्यार्थिनींसाठी सुरू केलेले कौशल्याधिष्टीत व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांची, विविध अभ्यासपूरक उपक्रमांची माहिती देत विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाविद्यालयास मिळालेल्या ११ रोजगाराभिमूख अभ्यासक्रमांची माहिती पथकाला देण्यात आली होती. याप्रसंगी शिक्षणतज्ञ अनिल राव, प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्रा. डॉ. एस.टी. इंगळे यांची उपस्थिती होती़ सोबतच पुढील वाटचालीची माहिती सुध्दा नॅक समितीला देण्यात आली होती. त्यानुसार पाहणीचा व तपासणीचा संपूर्ण अहवाल समितीकडून सादर करण्यात आला होता. त्याचा नुकताच निकाल लागला असून महाविद्यलयास विविध निकषांवर आधारित ३.१२ सरासरी गुण देऊन सदर समितीने ‘अ’ श्रेणीचे मूल्यांकन देण्यात आले आहे, अशी माहिती सुध्दा प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांनी दिली़यांनी घेतले परिश्रमनॅम मूल्यांकनासाठी महाविद्यालयातील सुकाणू समिती समन्वयक प्रा. डॉ.बी.पी.सावखेडकर, आर.एन.महाजन, प्रा. ए.एम.नेमाडे, प्रा. व्ही.जे.पाटील, आर.आर.ठोसरे, डॉ.बी.एस.पवार, एस.ए.परशुरामे, डॉ. डी.डी.नारखेडे, नितीन इंगळे, डॉ.एल.एस.पाटील, डॉ.एस.एस.चौधरी, डॉ.जे.डी.लेकुरवाळे, प्रा. एस.एस.राजपुत, एस.ए.झोपे, पी.एन.भिरूड, एम.आर.धांडे, एस.एन.चौधरी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव