डॉ.आंबेडकर विचार संमेलन यंदा जळगावात
By Admin | Updated: July 8, 2017 17:20 IST2017-07-08T17:20:21+5:302017-07-08T17:20:21+5:30
अंनिसतर्फे जि.प. प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित वैज्ञानिक जाणीवा शिबिराला काही व्यक्तींनी विरोध दर्शविला होता

डॉ.आंबेडकर विचार संमेलन यंदा जळगावात
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन 24 सप्टेंबर रोजी जळगावात आयोजित करण्याचा निर्णय अंनिस, जिल्हा महिला असोसिएशन व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकारपरिषदेत देण्यात आली.
अंनिसतर्फे जि.प. प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित वैज्ञानिक जाणीवा शिबिराला काही व्यक्तींनी विरोध दर्शविला होता. त्याला काही राजकीय पदाधिका:यांनीही पाठबळ दिले. त्यामुळे हे शिबिर रद्द करण्यात आले. त्याबद्दल विरोध करणा:यांचा अंनिस निषेध करीत असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले. यावेळी अंनिसचे राज्य कार्यवाह डॉ.प्रदीप जोशी, प्रा.बी. एस.कटय़ारे, जिल्हा महिला असोसिएशनच्या राजकमल पाटील, सामाजिक कार्यकत्र्या वासंती दिघे, अशफाक पिंजारी, विश्वजीत चौधरी उपस्थित होते. जातीप्रथेविरूद्ध लघुपट, माहितीपट, अॅनिमेशनपट बनविण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘विवेक’ राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.