महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरला अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:10 IST2018-04-05T22:10:15+5:302018-04-05T22:10:15+5:30

लेखी आश्वासनाची मुदत महिनाअखेरीस संपणार

 The DPR of parallel roads of the highway still waiting for approval | महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरला अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा

महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरला अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा

ठळक मुद्दे मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया अपघातांची मालिका सुरूच

जळगाव: शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ ला समांतर रस्ते तसेच या महामार्गाला ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यासाठीचा १३९ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ‘नही’मार्फत तयार करून तो मंजुरीसाठी ‘नही’च्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीची केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले जात असले तरीही १५ दिवस उलटूनही त्यास मंजुरी मिळालेली नाही. समांतर रस्त्यांअभावी महामार्गावर अपघातांची मालिका मात्र सुरूच आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनी समांतर रस्त्यांचे काम एप्रिल अखेर सुरू करण्याचे समांतर रस्ते कृती समितीला दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदतही संपत आली आहे.
मालविय कंपनीने सुमारे १३९ कोटी रुपये खचार्चा डीपीआर सादर केला आहे. हा डीपीआर गेल्या २३ मार्चला सादर झाला असून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मंजुरीची केवळ औपचारीकता बाकी असल्याचे सांगितले जात असताना १५ दिवस उलटूनही मंजुरी मिळालेली नाही. महामार्गावर मात्र अपघातांची मालिका सुरूच आहे.
मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया
यासंदर्भात ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता डीपीआर मंजुरीसाठी २३ मार्चलाच पाठविला असून त्यास मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगितले.

Web Title:  The DPR of parallel roads of the highway still waiting for approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.