आपत्तीत ना रडायचे, परिस्थितीशी लढायचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:35+5:302021-06-16T04:22:35+5:30
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा ...

आपत्तीत ना रडायचे, परिस्थितीशी लढायचे!
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांच्या अर्थसाहाय्याचा धनादेश दिला जातो. याअंतर्गत धरणगाव तालुक्यातील २० महिलांना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे एकूण ४ लाख मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकेतून योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील २० महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ४ लाखांचे तर एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या महिला वारसाला १ लाखाच्या मदतीचे धनादेश व पिठाची गिरणी प्रदान करण्यात आली. सर्व २१ गरजू महिलांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते १ महिन्याचा किराणा व साडी, चोळी देण्यात आले. सर्व लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेतून शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाहीदेखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एल. एन. सातपुते, प्रथमेश मोहोळ, न. पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, मोहन महाजन, उपसरपंच विलास पवार, महिला आघाडीच्या जना अक्का पाटील, मोहन महाजन, विनोद रोकडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार एल. एन. सातपुते यांनी केले. त्यांना नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, गायधनी, भट यांनी सहकार्य केले.
===Photopath===
140621\14jal_4_14062021_12.jpg
===Caption===
धनादेश साडी वाटपप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील व लाभार्थी. (छाया : कल्पेश महाजन)