जळगावात मंदिरातील दानपेटी फोडली
By Admin | Updated: June 30, 2017 17:21 IST2017-06-30T17:21:20+5:302017-06-30T17:21:20+5:30
चार हजार रुपयांचा ऐवज लंपास . शंभराच्या नोटा व चिल्लर ‘जैसे थे’

जळगावात मंदिरातील दानपेटी फोडली
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.30 - कांचन नगरात असलेल्या कालंका माता मंदिरातील दान पेटी फोडून चोरटय़ांनी त्यातील चार हजारांची रोकड लंपास केली आहे. ही रक्कम चोरुन नेत असताना दानपेटीत आणखी शंभराच्या काही नोटा व चिल्लर पेटीतच मिळून आल्या आहेत. चोरी करताना पकडल्या जाण्याच्या भीतीने चोरटय़ाने दानपेटी अर्धवट उघडी सोडून पळ काढला आहे.
कांचन नगरात कालंका मातेचे एक लहान मंदिर आहे. या मंदिराला ट्रस्टी अथवा पुजारी नाही. गल्लीतील नागरिकच तेथे देखभाल करतात. दर्शनाला जाणारे भक्त तेथील दानपेटीत दान स्वरुपात पैसे टाकत असतात. शुक्रवारी सकाळी गल्लीतील काही तरुणांना ही दान पेटी अर्धवट उघडी व कुलुप तुटलेले दिसले. ही घटना त्यांनी तत्काळ शनीपेठ पोलिसांना कळवली. लोखंडी सळईच्या सहाय्याने कुलूप तोडण्यात आले आहे.