शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

दोंडाईचा येथे आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न - पर्यटन मंत्र्यांनीच दाखविली चित्रफित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 17:30 IST

पाच वर्षीय पीडित बालिकेची जळगावात विचारपूस

ठळक मुद्दे शिक्षण व्यवस्थेबाबत महिला संघटनांनी व्यक्त केला रोषसंस्था चालकांच्या पुतण्याची दडपशाही

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २१ - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पीडीत पाच वर्षीय बालिकेच्या आई-वडिलांची बुधवारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन बालिकेची विचारपूस केली. या वेळी जळगावसह दोंडाईचा व इतर ठिकाणच्या विविध महिला संघटनांसह इतर संघटनांच्या पदाधिकाºयांनी रावल यांची भेट घेऊन शिक्षण व्यवस्था व एकूणच यंत्रणेबाबत रोष व्यक्त केला. महिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना दोंडाईचा येथेच आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट रावल यांनी करीत पिडीत मुलगी व तिच्या वडिलांची चित्रफितच दाखविली.दोंडाईचा येथील शाळेत ५ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने तिला शाळेच्या मागील बाजूस नेवून अत्याचार केल्याची घटना ८ रोजी घडली होती. या पीडित चिमुकलीला उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची विचारपूस करून कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार अमोल निकम, नगरसेवक सुनील माळी, माजी नगरसेवक भगत बालाणी, आदींसह विविध सामाजिक संघटना व महिला संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.संबंधित शाळेची मान्यता रद्द करा - महिलांची एकमुखी मागणीसंबंधित शाळेमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने व या शाळेबाबत तक्रारी वाढत असल्याने या शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या वेळी महिलांनी केली. या सोबतच अल्पवयीन मुलींना शारीरिक बदल आणि व्यक्तींची ओळख देणे, स्वसंरक्षण कसे करावे याबाबत मुलींना शाळेत प्रशिक्षण द्यायला हवे, शिक्षणमंत्र्यांनी तसा नियम करावा, अत्याचार झालेल्या संस्थेची मान्यता रद्द करावी, मनोधैर्य योजनेत अल्पवयीन मुलींना तात्काळ मदत मिळावी, पीडित बालिकेसाठी रुग्णालयात वेगळ््या कक्षाची सोय करावी, अशा मागण्या महिला संघटनेच्या पदाधिकाºयांनी रावल यांच्याकडे केल्या. या शाळेत कोणत्याही सुविधा नसताना या शाळेला मान्यता कशी मिळाली, असा सवाल या वेळी महिलांनी उपस्थित केला.आरोपीस ओळखणारी शिक्षिकाही फरारशाळेत चिमुकली डबा खात असताना तो व्यक्ती तिला घेऊन जात होता, त्यावेळी तिने आरडाओरडही केला. परंतु कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही, अत्याचार करणारा तिच्याच परिसरातील असून घटनेनंतर एका शिक्षिकेने त्याला रागावले होते. सध्या ती शिक्षिकादेखील फरार असल्याचे या वेळी उपस्थित नातेवाईक व महिलांनी रावल यांच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वीदेखील अनेक घटना शाळेतच दडपल्या असतील, असा आरोप करून शाळेला संरक्षक भिंत नाही, सुरक्षारक्षक नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नाही, अत्याचार घडूनही शाळा सुरूच असल्याने पीडितेचे नातेवाईक व महिला संघटनांनी रोष व्यक्त केला.आणखी एका पीडीत मुलगी व पित्याची चित्रफितया पूर्वी १५ जानेवारी रोजी दोंडाईचा येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. तिने स्वत:ची सुटका करून पळ काढल्याने ती बचावली. परंतु नंतर त्या मुलीच्या पालकांवर दबाब आणण्यात आल्याने ते प्रकरण दडपण्यात आले. याप्रकरणी पीडीत मुलीने दिलेला जबाब, तिच्या पालकांचे म्हणणे असलेली चित्रफित खुद्द रावल यांनी उपस्थित महिलांना व त्यानंतर पत्रकारांनाही दाखवली. या मुलीच्या पित्याला धमकी दिली जात असल्याने तो पोलिसांकडे तक्रार देण्यास नाही म्हणत असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले, मात्र सुमोटो म्हणून कारवाई केली जाईल, असेही रावल म्हणाले.संस्था चालकांच्या पुतण्याची दडपशाहीअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रतीक महाले हा संस्थाचालक हेमंत देशमुख यांचा पुतण्या असून त्याची शाळेत मोठी दहशत असल्याचा दावा जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या पूर्वी याच प्रतीक महाले याने शाळेतील एका शिक्षिकेच्या मुलीचे अपहरण करून लग्न केले व या धक्याने मुलीच्या वडिलांचे निधन झाले, असेही रावल म्हणाले. वडिलांचे उत्तरकार्य होण्यापूर्वीच पटेल याने शिक्षिकेला धमकी देत मुलगी माझ्या ताब्यात द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा दम भरला होता, असे रावल यांनी सांगितले. त्यामुळे या शिक्षिकेने दोंडाईचा शहर सोडून ती आता शहादा येथे राहायला गेल्याचा दावा रावल यांनी केला. या सोबतच दोंडाईचा प्रकरणातीलच आरोपी नंदू सोनवणे यानेदेखील एका कार्यकर्त्याच्या मुलीला पळवून नेले व त्याच्या दहशतीमुळे त्या व्यक्तीलादेखील शहर सोडावे लागले, असे रावल म्हणाले. या वेळी उपस्थित काही पालकांनीही या शाळेबद्दल रोष व्यक्त केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव