शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीला रोखण्यासाठी घरगुती हॅलोजन सापळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 12:33 IST

कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळीमुळे शेतक-यांमध्ये मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे.

- अर्पण लोढा ।जामनेर (जि. जळगाव) : कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळीमुळे शेतक-यांमध्ये मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या शेतांमध्ये तीव्र क्षमतेचे हॅलोजन सापळा लावून बोंडअळीचे पतंगच नाहीसे करण्याचा उपाय वाकोद ता. जामनेर येथील शेतक-यांनी शोधून काढला आहे. जामनेर आणि परिसरात कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. या मे महिन्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर सद्यास्थितीमध्ये रस शोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. याशिवाय पूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. एवढेच नाही तर जिनींगमध्ये देखील बोंडअळीचे पतंग आढळत आहेत. पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असणाºया कपाशीवर बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात फरदडमुळे अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी देखील शेतात ठेवली होती. मागील हंगामामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासूनच झाला होता. त्यामुळे या हंगामामध्ये या किडीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. ही अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर तिला रोखणे कठीण होते. त्यामुळे अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत बोंडअळीला रोखणे गरजेचे बनले आहे.असा आहे घरगुती जुगाडबोंडअळीमुळे गेल्या हंगामात निम्मे उत्पन्न घटल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यावर शेतकºयांकडून आतापासून उपाय केले जात आहेत. बोंडअळीचे पतंग किंवा अंडी शेतात असल्यास शेतात ठिकठिकाणी ट्रॅप लावले जात आहेत. यामुळे फक्त पिकावर अळीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे समजते. जामनेर तालुक्याच्या काही भागात शेतक-यांनी बोंडअळीच्या पतंगानाच आहे त्याच ठिकाणी रोखण्याचा उपाय सुरु केला आहे.

असा आहे उपाय -एक पत्र्याचा डबा घेवून त्याला पिवळा रंग लावायचा. या डब्यात दोन हजार वॅटचा हॅलोजन बल्ब (फोकस) शेतातील एका खांबावर लावावा. रात्रभर हा हॅलोजन सुरु ठेवायचा. यामुळे बोंडअळीचे पतंग दिव्याकडे आकर्षित होतात आणि दिव्याच्या उष्णतेने तेथेच मरून पडतात. हा उपाय सध्या परिसरात अनेक शेतकरी करीत आहेत. 

 

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र