शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुणी जळगावला येतं का जळगावला? महसुल अधिकाऱ्यांची ‘ना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 15:15 IST

तीन पदे रिक्त, दोन दिवसात निघणार पुन्हा बदल्यांचे आदेश

कुंदन पाटील, जळगाव: राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले. या बदल्या करताना जळगाव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांना ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले. तर जळगावच्या महसुल प्रशासनात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तीन जागांवर अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत.दरम्यान, जळगावातील  राजकीय आणि प्रशासकीय गोंधळाविषयी ऐकून निवासी उपजिल्हाधिकारी पदावर येण्यास अनेकांनी नकार दिला आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्त झालेले संजय गायकवाडही जळगाव येण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे.

९ उपजिल्हाधिकारी व ८ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश तीन दिवसांपूर्वी  काढण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याजागी अद्याप नियुक्ती नाही. धुळ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना जिल्हा  पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. त्यानुसार सुनील  सुर्यवंशी यांनी तत्काळ पदभार सोडला होता. मात्र गायकवाड अद्याप रुजू झालेले नाहीत. तर सुर्यंवशी हेदेखिल नियुक्तीच्या प्रतिक्षेतच आहेत. तसेच निवडणुक शाखेतील तहसीलदार हंसराज पाटील यांचीही बदली झाली आहे. त्यांनीही पदभार सोडला असून त्यांच्याजागी मात्र अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी हेदेखिल नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

नवे ‘आरडीसी’ कोण?

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची नगरला निवडणुक शाखेत बदली झाली. त्यांनीही पदभार सोडला. मात्र या महत्त्वाच्या पदावरही नियुक्ती झालेली नाही. माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती होणार आहे. मात्र अनेक अधिकारी जळगावी यायला तयार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.

तिघांच्या बदल्या

धुळ्यातील रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल प्रशासनाची धुरा देण्यात आली आहे.नाशिकचे गणेश मिसाळ यांना  नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून तर श्रीरामपूर (अहमदनगर) प्रांताधिकारी अनील पवार यांची नियोजन विभागाच्या अपर मुख्य सचीव मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी मात्र अजुनही नियुक्तीच्या प्रतिक्षेतच आहेत.तसेच एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांनदेखिल नियुक्ती मिळालेली नाही.

दोन दिवसात बदल्या

दरम्यान, रिक्त जागांसह प्रतिक्षेत असणाऱ्या तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या अधिकाऱ्यांमध्ये चाळीसगाव, पाचोरा प्रांताधिकारी तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव