भुसावळात कोरोना योद्ध्यांसाठी डॉक्टरांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:39 IST2020-05-16T15:39:08+5:302020-05-16T15:39:46+5:30
पालिका आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत होमिओपॅथिक औषधी वाटप करण्यात आली.

भुसावळात कोरोना योद्ध्यांसाठी डॉक्टरांचा पुढाकार
भुसावळ : शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशात कर्तव्यावर जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी शहरातील होमिओपॅथिक डॉ.नयन महाजन, रूपाली महाजन, डॉ.हितेश भोळे यांच्या माध्यमातून पालिका आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत होमिओपॅथिक औषधी वाटप करण्यात आली.
शहरात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. अशात कर्तव्यावर असताना संसर्ग होऊ नये, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याकरिता डॉ.नयन महाजन, डॉ.रूपाली महाजन, डॉ.हितेश भोळे यांनी कोरोना योद्धे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व त्यांच्या ३०० सैनिकांना, ३०० होमगार्डला, तर पालिकेच्या आरोग्य विभागाला ३०० याप्रमाणे होमिओपॅथिक औषधी मोफत वाटप करण्यात आली. या होमिओपॅथिक औषधीने रोगप्रतिकारक शक्ती वाढते हीच औषधी केरळ व अन्य राज्यांमध्ये देण्यात येत आहे. याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी औषधी लाभदायक आहे. पालिका रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्याकडे गोळ्या देण्यात आल्या. याशिवाय बँकेत कर्मचारी, अधिकाºयांनाह औषधी वाटप करण्यात आली.