डॉक्टर बोगस!
By Admin | Updated: February 18, 2016 00:10 IST2016-02-18T00:10:36+5:302016-02-18T00:10:36+5:30
तिघांवर गुन्हे दाखल करा : आयुक्त

डॉक्टर बोगस!
धुळे : बोगस डॉक्टरांबाबत प्राप्त झालेल्या आठ तक्रारींच्या चौकशीअंती शहरातील तीन डॉक्टर बोगस असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिले आहेत़ यात डॉ़ गोपाल सोलंकी (शिवशक्ती, चितोड रोड), डॉ़ ए़आऱकपूर (गल्ली नं़ 2) आणि डॉ़ जहूर अन्सारी (पालाबाजार, मौलवीगंज) यांचा समावेश आह़े बोगस डॉक्टरांसंदर्भात जिल्हाधिका:यांकडे चार व मनपाकडे चार तक्रारी होत्या़ डॉ़ सोलंकी यांची कुठल्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसल्याचे आणि बीएएमएस असलेल्या आपल्या मुलाच्या नावे फलक लावून ते व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. डॉ़ कपूर व डॉ़ अन्सारी यांची वैद्यकीय परिषदेकडे यापूर्वी नोंद होती, परंतु गेल्या अनेक वर्षापासून नोंदणीचे नूतनीकरण न करण्यात आल्याचे दिसून आले आह़े आरोग्याधिकारी डॉ़ बी़बी़माळी यांनी संबंधित भागातील वैद्यकीय अधिका:यांना गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आह़े त्यामुळे कधीही या डॉक्टरांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आह़े