शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

शासन तुला मनपावर भरोसा नाय का..? - जळगावात विरोधकांकडून खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:55 IST

नगरोथ्थानच्या कामावरुन शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना घेतले धारेवर

जळगाव : नगरोथ्थान अंतर्गत मनपाला मिळालेल्या १०० कोटींपैकी मंजूर करण्यात आलेल्या ४२ कोटी रुपयांची कामे सार्वजनिक विभागाकडून करण्यात येत असल्याचा मुद्यावरून शनिवारी झालेल्या महासभेत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महासभेत शिवसेना नगरसेवकांनी ‘शासन तुला मनपावर भरवसा नाय का?,शासन तुला तुझ्या भाजपाच्याच नगरसेवकांवर भरवसा नाय का? असे म्हणत भाजपा नगरसेवकांची चांगलीच खिल्ली उडवली.मनपाची शनिवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.महासभेच्या विषयपत्रिकेवरील १८ विषयांपैकी दोन विषय तहकूब ठेवून १६ विषय मंजूर करण्यात आले. तसेच आयत्यावेळी आलेल्या तीन विषयांना देखील मंजुरी देण्यात आली.मनपा हिश्श्यातील रक्कम आणणार कोठूनसुरुवातीला १०० कोटी रुपयांच्या निधीतून ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे शिवसेनेचे नितिन लढ्ढा यांनी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र,शासनाने ४२ कोटी दिले असले तरी हा निधी खर्च करण्यासाठी मनपाला आपल्या हिश्श्यातून १२ कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने हा खर्च कोठून आणणार असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. १०० कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मनपाला नगरोथ्थानच्या नियमाप्रमाणे ३० कोटी द्यावे लागणार असून, मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपला हिस्सा कसा देणार ? हा प्रश्न महासभेत उपस्थित केला. त्यावर नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांनी हा निधी शासनाकडून मिळणार असून, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे सक्षम असल्याचे सांगितले.ट्रॅफीक गार्डनच्या जागेवर तयार होणार जिल्हा न्यायालयाची नवी इमारतशासन मालकीच्या मात्र मनपाचे आरक्षण असलेल्या ट्रॅफीक गार्डनवर जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत तयार करण्यासाठी ही जागा मिळावी याबाबतचा प्रस्ताव जिल्हा न्यायालयाकडून मिळाला होता. या प्रस्तावला महासभेने मंजुरी दिली. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेचे नगरसेवक इबा पटेल व एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी विरोध केला. ही जागा स्वातंत्र्यसेनानी मीर शुकूल्लाह यांचे नाव देण्यात आल्याने याठिकाणी उद्यान तयार करण्याची मागणी त्यांनी केली किंवा त्या जागेला मीर शुकूल्लाह यांचे नाव देण्याची मागणी केली.भंगार बाजार कारवाई पुन्हा रखडलीभंगार बाजार ९९ वषार्साठी भाडेकरारावर देण्याचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, याबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. दरम्यान, भंगार बाजाराबातचा हाच प्रस्ताव मार्च महिन्यात झालेल्या महासभेपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, तेव्हा देखील हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा समिती स्थापन करण्याचा नावावर भंगार बाजाराला अभय दिल्याचेच दिसून आले. अ‍ॅड. शुुचिता हाडा यांनी मनपाची जागा रेडक्रॉस सोसायटीजवळ असून त्याबाबत प्रशासनाचे लक्ष नसल्याचे सांगितले ती जागा ताब्यात घेण्याचा विषयाला मंजुरीदेण्यात आली. तसेच अशा अनेक मनपाच्या जागा असून त्या शोधून ताब्यात घेणे व त्यातून उत्पन्न मिळविण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्याची सूचना त्यांनी मांडली. यावेळी नितिन लढ्ढा यांनी मेहरुण येथिल घरकुलासाठी संपादित जागेचा मोबदला देवून देखील जमिन मालकाने काही भाग कब्जा ठेवला असल्याचे सांगीतले. एलईडीच्या बोगस कारभारबाबत मक्तेदाराला नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याला १७ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली.बांधकाम विभागाकडे कामे सोपविल्याने सत्ताधारी-विरोधक भिडले१ आॅगस्ट रोजी जाहीर केलेल्या निर्णयात मनपासाठी मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतील कामे मनपाकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्याने नितीन लढ्ढा यांनी आक्षेप घेतला. तसेच ही कामे मनपाअंतर्गत करण्यात आली तरच त्यावर नियंत्रण ठेवता येवू शकते असे सांगितले.याआरोपानंतर भाजपा नगरसेवक आक्रमक झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यातच शिवसेनेचे प्रशांत नाईक यांनी शासन तुला मनपावर भरोसा नाही का ? हे गीत सुरु करत व त्या गीताला इतर सेना नगरसेवकांनीही साथ दिल्याने सत्ताधाºयांची चांगलीच खिल्ली उडविली.भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांनी कामे मनपाकडून होवोत की बांधकाम विभागाकडून कामे होणे महत्वाचे असल्याचे सांगत, मनपाकडून होणाºया कामांमध्ये तुमचा रस असल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेना सदस्य आणखीनच आक्रमक झालेले दिसून आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव