शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जळगाव जिल्ह्याशी संबधित या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 17:26 IST

महाभारत आणि रामायण काळाचे संदर्भ मिळतात मध्ययुगीन कालखंडात

ठळक मुद्दे३०० परगणे असलेल्या खान्देशची राजधानी होती बºहाणपूरआताचा खान्देश इतिहासकालिन असीरगडगिरीपर्णाची झाली गिरणानदीखान्देश होती कापडांची बाजारपेठ

विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : कापूस, केळी व सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. रामायण आणि महाभारतकाळातील घटना आणि घडामोडी जळगाव जिल्ह्याशी संबधित आढळून आलेल्या आहेत. श्री क्षेत्र पद्मालय येथे भीमाने बकासूराचा वध केला होता. तर प्रभु रामाने बाण मारून उनपदेव व सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे निर्माण केले. राजा दशरथाने श्रावण बाळाच्या हत्येचे परिमार्जन पूर्वीच्या एदलाबादजवळील पवित्र तलावात केल्याचे संदर्भ मिळून आले आहेत.आताचा खान्देश इतिहासकालिन असीरगडप्राचीन काळी हा प्रदेश निर्जन होता. असीरगडजवळ थोडी मानवी वसाहत होती. या वसाहतीचा संबध महाभारत महाकाव्यातील द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा याच्याशी होता. महाभारत काळात तोरणमाळचा एक राजा पांडवांच्या बाजूने लढला असे म्हटले जाते. या महाकाव्यातील एकचक्रनगरी म्हणजे सध्याचे एरंडोल असे स्थानिक अभ्यासक सांगतात. भीमाने बकासुराचा वध पद्मालयजवळ केला होता. अबुल फजल ज्याला अदिलाबाद म्हणतो ते एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) हे चांगले नगर होते. राजा दशरथाने श्रावण बाळाची हत्या करून जे महापातक केले होते. त्याचे परिमार्जन दशरथाने एदलाबादजवळील पवित्र तलावात केले. या तलावात बारमाही पाणी असून १६ व्या शतकापासून शेतीसाठी जलसिंचन करण्यात येते.३०० परगणे असलेल्या खान्देशची राजधानी होती बºहाणपूरइतिहासकार बर्निअरने लिहून ठेवल्यानुसार खान्देशात ३०० परगणे अस्तित्वात होते. बºहाणपूर ही खान्देशची राजधानी होती. खान्देशातील सुभ्याचा एकुण महसूल त्यावेळी १८ लाख ५५ हजार रुपये होता. मुघलकालिन हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जळगाव व भुसावळचा उल्लेख नाही. मात्र अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहादरपूर, जामनेर, जामोद, जैनाबाद या गावांचा उल्लेख सापडतो.गिरीपर्णाची झाली गिरणानदीमालेगाव तालुक्यातील वजिरखेडे येथे उत्खननात सापडलेल्या दोन ताम्रपटांमध्ये गिरणा नदीचा उल्लेख गिरीपर्णा असा आढळतो. या ताम्रपटाचा लेखनकाल इ.स.९१५ मानला जातो. ताम्रपटवरील संस्कृत प्रशस्तीचा लेखक कवी राजेश्वर आहे. गिरीपर्णाचा अपभ्रंश होऊन नदीला गिरणा नाव पडले असावे.खान्देश होती कापडांची बाजारपेठइ.स.१६५६ पासून १७१७ पर्यंत मुघल राजवटीत जबाबदारीची व मानाचे स्थान भूषविणारा व्हेनिसचा निकोलाव मनुची अनेक वेळा खान्देश भ्रमंतीवर आला. त्याने समक्ष पाहिलेल्या घटनांच्या आठवणी चार ग्रंथांच्या रुपाने लिहून ठेवल्या. बºहाणपूरला उत्तम कापड, महिलांचे दुपट्टे व बुरखे तयार होत असल्याने पर्शियन व आर्मेनियन व्यापारी वारंवार खरेदीसाठी येत होते. याठिकाणी पांढरे व रंगीत तलम कापड आणि रंगीत छापील कापड तयार करण्यात येई. बरेच कापड पर्सिया, टर्की व अरबस्तानला निर्यात होत असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरAmalnerअमळनेर