मला ओळखले का? मी सुमनबाईंचा नातू़़़ सांगत अनेकांना गंडविले
By Admin | Updated: April 6, 2017 18:11 IST2017-04-06T18:00:07+5:302017-04-06T18:11:40+5:30
कांचननगरातील संशयित डिगंबर कौतिक मानकर याने जिल्हाभरात अनेकांना गंडविले असल्याची माहिती समोर आली आह़े

मला ओळखले का? मी सुमनबाईंचा नातू़़़ सांगत अनेकांना गंडविले
>जळगाव,दि.6- : मला ओळखले का? मी सुमनबाईंचा नातू, असे म्हणत एखाद्या वृध्द, प्रौढ नागरिकाचा विश्वास संपादन करायचा आणि किराणा तसेच इतर साहित्य खरेदीचे कारण सांगून काही मिनिटात पैसे करतो, हा फंडा वापरत कांचननगरातील संशयित डिगंबर कौतिक मानकर याने जिल्हाभरात अनेकांना गंडविले असल्याची माहिती समोर आली आह़े
डिगंबर मानकर विरोधातफैजपूर येथे एकाला 12 हजार रुपयांत गंडविल्या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी डिंगबर हा जळगावात असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, मोतीलाल पाटील, उमाकांत चौधरी, संजय धनगर. जितेंद्र सोनवने, अनिल धांडे यांच्या पथकाने सापळा रचून आकाशवाणी चौकातून ताब्यात घेतले होत़े त्याची चौकशी केली असता त्याने फैजपूर येथील गुन्ह्याची कबुली दिली होती़