'कोरोना'शी दोन हात करण्यासाठी 'करा योगा, वाढवा रोग प्रतिकारशक्ती'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:18 IST2020-05-28T20:02:52+5:302020-05-28T21:18:54+5:30
भुसावळ , जि.जळगाव : शहराने कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येने जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ...

'कोरोना'शी दोन हात करण्यासाठी 'करा योगा, वाढवा रोग प्रतिकारशक्ती'
भुसावळ, जि.जळगाव : शहराने कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येने जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी 'करा योगा, वाढवा रोगप्रतिकारक शक्ती' यासाठी शहरातील काही योगातज्ञ भुसावळकरांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, योगाच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.
शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांनुसार, नागरिक पहाटे पाच ते सायंकाळी सात या दरम्यान खुल्या क्रीडांगणावर किंवा फुटपाथवर रनिंग, वॉकिंग, जॉगिंग किंवा सायकलींग व व्यायामासाठी घराच्या बाहेर जाऊ शकतात. परंतु त्याचबरोबर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, शहरात संपूर्ण जिल्ह्यात त्या तुलनेत कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अर्थात परिसरात ॲक्टिव रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याअनुषंगाने भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी भुसावळकरांसाठी कोरोना दोन हात करण्यासाठी व्यायाम, प्राणायाम मेडिटेशन योगा मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागरिकांनी योगा प्राणायामवर जास्तीत जास्त भर द्यावा. काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहान भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य
प्रा. प्रवीण फालक यांनी केले आहे.