शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 4:11 PM

अमळनेर येथे व्याख्यानात असिस्टंट प्रोफेसर डॉ.विवेक बोरसे यांची माहिती

अमळनेर, जि.जळगाव : सध्या कॅन्सर ही खूप मोठी समस्या आहे. त्यावरील उपचार सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीला परवडत नाही. काही जण खर्चाच्या भीतीने त्यावर उपचार करणेही टाळतात. गरीबातील गरीब माणसाला परवडेल असे संशोधन भविष्यात करायचे आहे, त्यासाठी शासनाकडून नव्वद लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, असे प्रतिपादन आयआयटी गुवाहाटी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून निवड झालेले डॉ.विवेक बोरसे यांनी केले.येथील प्रताप महाविद्यालय अमळनेर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या ज्योती राणे यांनी डॉ.विवेक बोरसे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रताप महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन डॉ.बोरसे यांनी जे यश संपादन केले आहे ते आमच्यासाठी खूप आभिमानस्पद आहे. सामान्यज्ञान, विशेषज्ञान संशोधनविषयक ज्ञान व व्यावहारिक ज्ञान याचा उत्कृष्ट संगम असेल तर जीवनात उतुंग करिअर करता येते, असे मत उपप्राचार्य प्रा.एस.ओ.माळी यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ.बोरसे यांचे वडील भास्कर बोरसे, प्रा.वारुळे, प्रा.भुतडा, प्रा.गुलाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ.बोरसे पुढे म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवले की,, आत्मविश्वास निर्माण होत जातो आणि यश आपोआप मिळत जाते. आईवडील, शिक्षक, प्राध्यापक, मित्र, नातेवाईक यांच्यापासून खूप प्रेरणा मिळाली. बारावीनंतर आपले आवडीचे क्षेत्र निवडा, जे क्षेत्र निवडाल त्याच्यात जीव ओतून काम करा, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. आयआयटी पवईमध्ये बेस्ट पीएचडी थिसिस अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला. शासनातर्फे इंस्पायर फॅकल्टी पुरस्कार मिळाला. यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचे हे फळ आहे. प्रताप महाविद्यालयात शिकलो आणि याच महाविद्यालयात माझा सन्मान झाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. यातून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक आव्हानांवर मात करायची आहे, सर्वांचे आशीर्वाद आहेत, यश नक्की मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. शेकडो विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. उपप्राचार्य पी.आर.भावसार यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक पी. बी.अग्रवाल यांनी आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर