शेअर्सची रक्कम कपात नकोच!
By Admin | Updated: September 26, 2015 23:57 IST2015-09-26T23:57:44+5:302015-09-26T23:57:44+5:30
धुळे : जिल्हा बँकेमार्फत शेतक:यांना देण्यात येणा:या पीककर्जावरील शेअर्सची रक्कम शेतक:यांकडून कपात न करता शासनाकडून उपलब्ध करून घ्यावी, असा प्रस्ताव बँकेचे संचालक श्यामकांत सनेर यांनी मांडला़

शेअर्सची रक्कम कपात नकोच!
धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेमार्फत शेतक:यांना देण्यात येणा:या पीककर्जावरील शेअर्सची रक्कम शेतक:यांकडून कपात न करता शासनाकडून उपलब्ध करून घ्यावी, असा प्रस्ताव बँकेचे संचालक श्यामकांत सनेर यांनी सभेतून मांडला़ धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली़ अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे होत़े संचालक मंडळाची उपस्थिती होती़ सनेर म्हणाले, शेतक:यांना जास्तीत जास्त कर्जाचा पुरवठा करून देणे आवश्यक आह़े त्यांच्या या प्रस्तावाला उपस्थितांनी पाठिंबा देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास मंजुरी दिली़ मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी आर्थिक स्थितीचे विवेचन केल़े सभासदांनी ठेवी वाढवाव्यात, असे राजवर्धन कदमबांडे म्हणाल़े