दोस्ती की कसम, गलत कदम मत उठावो.
By Admin | Updated: October 24, 2015 00:32 IST2015-10-24T00:32:58+5:302015-10-24T00:32:58+5:30
जळगाव : सादरे साहब.आपको हमारी दोस्ती की कसम है..प्लीज, आप कुछ गलत कदम मत उठाना..हम आपसे मिलने आते है.. हे शब्द आहेत अशोक सादरे यांचे मित्र पत्रकार अय्याज मोहसीन यांचे.

दोस्ती की कसम, गलत कदम मत उठावो.
जळगाव : सादरे साहब.आपको हमारी दोस्ती की, आपके परिवार की और आप जिससे दिलसे चाहते हो उसकी कसम है..प्लीज, आप कुछ गलत कदम मत उठाना..हम आपसे मिलने आते है.. हे शब्द आहेत अशोक सादरे यांचे मित्र पत्रकार अय्याज मोहसीन यांचे. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्याशी मोहसीन यांचे आत्महत्या करण्यापूर्वीच्या दिवशी शेवटचे बोलणे झाले होते. तपासाधिका:यांकडे त्यांनी तसा जबाब नोंदविला आहे.
सात मिनिटे झाले बोलणे
अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्रकार आनंद शर्मा यांना व्हॉटस् अॅप वर सकाळी सुसाईड नोट पाठविली होती. तसेच कॉलही केला होता. परंतु शर्मा यांनी त्या कॉलला प्रतिसाद दिला नव्हता. नंतर सुसाईट नोट पाहिल्यावर त्यांनी मित्र अय्याज मोहसीन यांना ही माहिती दिली. त्यानंतर मोहसीन यांनी सादरे यांना सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी कॉल केला. तब्बल सात मिनिटे सात सेकंद या दोघांमध्ये बोलणे झाले. त्यानंतर सादरे यांचाही कोणाशीही संपर्क झालेला नाही.
मोहसीन यांनी सादरे यांना तुम्ही चुकीचे पाऊल उचलू नका. हवे तर आम्ही तेथे येतो. चर्चेतून नक्कीच चांगला मार्ग निघेल, असे सांगितले. तर सादरे यांनी तुला आनंदने काही सांगितले का? अशी मोहसीन यांना विचारणा केली. त्यावर आनंदशी बोलणे झाल्यामुळेच मी तुम्हाला कॉल केला आहे. आम्ही तुम्हाला भेटायला येतो, असे सांगून वेळ मागितली. त्यावर सादरे यांनी दुपारी चार वाजता फोन करतो असे सांगितले, परंतु नंतर त्यांचा फोन आलाच नाही.