नाण्यांच्या लखलखाटाने महामार्गावर दिवाळी!

By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-04T00:08:25+5:302015-11-04T00:08:25+5:30

शिरपूर : भरधाव वेगाने जाणा:या ट्रकमधून कच्च्या नाण्यांचे 20 ड्रम रस्त्यावर पडल्यामुळे नरडाणे गावाजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी सर्वत्र नाण्यांचा लखलखाट बघायला मिळाला.

Diwali on the highway on the highways! | नाण्यांच्या लखलखाटाने महामार्गावर दिवाळी!

नाण्यांच्या लखलखाटाने महामार्गावर दिवाळी!

शिरपूर : भरधाव वेगाने जाणा:या ट्रकमधून कच्च्या नाण्यांचे 20 ड्रम रस्त्यावर पडल्यामुळे नरडाणे गावाजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी सर्वत्र नाण्यांचा लखलखाट बघायला मिळाला.

ही टांकसाळीत छापून तयार झालेली चलनी नाणी असल्याचे समजून काहींनी ते नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या नाण्याच्या आकारातील धातूच्या केवळ चकत्या असल्याचे लक्षात असल्यावर त्यांनी तो प्रय} सोडून दिला. मंगळवारी सकाळी नऊ वाजेस रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली़

नाणी ड्रममध्ये घटनास्थळी रस्त्याच्या कडेला लावून ठेवण्यात आली आहेत. यासंदर्भात भारतीय रिझव्र्ह बँकेच्या अधिका:यांना कळविण्यात आले आहे. तोवर नाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली आहेत.

गाडी चढावावर असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने गाडीतील ड्रम कलंडून रस्त्यावर पडले आणि महामार्गावर कच्च्या नाण्यांच्या चमचमाटाचे आश्चर्यजनक दृश्य बघायला मिळाले.

चिल्लरबाजाराला सुरक्षा

नाणी कुठली?

बंगळुरू येथून कच्ची नाणी एमएच 04-एफयू -6957 या क्रमांकाच्या ट्रकने दिल्लीनजीकच्या नोएडा येथे टांकसाळीत नेण्यात येत होती. नरडाणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली़ सद्भावना कंपनीच्या कर्मचा:यांच्या मदतीने रस्त्यावरची ही चिल्लर गोळा करण्यात आली़

Web Title: Diwali on the highway on the highways!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.