मुक्ताईनगर येथे दिव्यांगांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 19:47 IST2020-08-15T19:43:42+5:302020-08-15T19:47:07+5:30
मुक्ताईनगर : विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी स्वातंत्र्य दिनी शनिवारी पंचायत समितीसमोर उपोषण केले. डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात ...

मुक्ताईनगर येथे दिव्यांगांचे उपोषण
मुक्ताईनगर : विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी स्वातंत्र्य दिनी शनिवारी पंचायत समितीसमोर उपोषण केले. डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नगर पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी बँक खात्यात जमा व्हावा, परिवाराला ५० टक्के कर सवलत मिळावी या मागण्यांसाठी दिव्यांगांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता, त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर येथील पंचायत समितीसमोर सकाळी उपोषण सुरू केले. तेव्हा प्रशासनाची तारांबळ उडाली.
यावर १५ दिवसात तालुक्यातील ग्राम पंचायतीत अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले.
तहसीलदार श्याम वाडेकर आणि नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनीदेखील लेखी आश्वासन दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.