धनगर समाज महासंघातर्फे शुक्रवारी विभागीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:50+5:302021-08-26T04:19:50+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हारसेना आणि अहिल्या महिला संघ कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी ...

धनगर समाज महासंघातर्फे शुक्रवारी विभागीय मेळावा
जळगाव : महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हारसेना आणि अहिल्या महिला संघ कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी १० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आंबेडकर मार्केट येथील गुलाबराव देवकर महाविद्यालयात पार पडेल.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिमण डांगे, बबनराव रानगे, सुनील वाघ, डॉ.अलका गोडे, सुभाष सोनवणे, अंकुश निर्मळ आदी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, पुण्यतिथी कार्यक्रमानंतर धनगर समाज महासंघ व मल्हारसेनेचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावाही होणार आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन सुभाष करे, प्रभाकर न्हाळदे, डॉ.संजय पाटील, संदीप मनोरे, हिलाल सोनवणे, महेंद्र सोनवणे, गणेश बागुल, डिगंबर सोनवणे, प्रवीण पवार, दिलीप धनगर, संतोष कचरे आदींनी केले आहे.