भुसावळात रेल्वेच्या मंडल अभियंत्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:39+5:302021-08-17T04:23:39+5:30
कार्यालय अधीक्षकालाही ४० हजार रुपये घेताना पकडले भुसावळ, जि. जळगाव : वर्कऑर्डर देण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना ...

भुसावळात रेल्वेच्या मंडल अभियंत्यास
कार्यालय अधीक्षकालाही ४० हजार रुपये घेताना पकडले
भुसावळ, जि. जळगाव : वर्कऑर्डर देण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना मध्य रेल्वेचा भुसावळ येथील मंडल अभियंता एम.एल. गुप्ता व त्याच्या कार्यालयातील मुख्य कार्यालय अधीक्षक संजीव रडे याला ४० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने अटक केली. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याच्याच कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांचे पथक भुसावळात तळ ठोकून होते. सोमवारी त्यांनी भुसावळ येथील गुप्ता याच्या कार्यालयात ही कारवाई केली. कारवाई होताच डीआरएम कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. मलकापूर येथील एम.एन.वाय. कन्सल्टिंग प्रा. लि. या कंपनीने याबाबत दिल्ली येथील सीबीआयकडे या लाचेसंबंधी तक्रार केली होती.
मंडल अभियंता एम.एल. गुप्ता याला दोन लाखांची लाच घेताना अटक केली. या कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने गुप्ता याच्या ऑफिसर कॉलनीतील निवासस्थानी धाड टाकली. यात ५० लाख रुपयांची रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तर समर्थ कॉलनीतील रडे याच्या निवासस्थानीही सायंकाळी उशिरापर्यंत तपासणीची कारवाई सुरू होती.