चुंचाळे सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:28+5:302021-06-02T04:14:28+5:30

तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षांपूर्वी डिसेंबर २०१७मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या, ...

Distrust against Chunchale Sarpanch Sunanda Patil | चुंचाळे सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास

चुंचाळे सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास

तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षांपूर्वी डिसेंबर २०१७मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या, तर गेल्या काही महिन्यांपासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाहीत म्हणून सोमवारी येथील तहसील कार्यालयात उपसरपंच नाजिमा अन्वर तडवी यांच्यासह सदस्यांनी सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव तहसीलदार महेश पवार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

या अविश्वास प्रस्तावावर सुकलाल यशवंत पाटील, अनिल पंडित कोळी, अरमान मनवर तडवी, दगडू किताब तडवी, शारदा सुधाकर चौधरी, नवशाद सायबू तडवी, जयनूर संजय तडवी व सिंधूबाई संजय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरपंच यांच्याविरुद्ध दाखल करण्याच्या झालेल्या अविश्वास ठरावावर आता तहसीलदार कधी विशेष सभा बोलवतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Distrust against Chunchale Sarpanch Sunanda Patil