जिल्ह्याला मिळणार लसींचे ७० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:31+5:302021-05-05T04:27:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यातील ४५ वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी ५ मे ...

जिल्ह्याला मिळणार लसींचे ७० हजार डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यातील ४५ वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी ५ मे रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी कळविले आहे. मात्र राज्याला मिळालेल्या लसींच्या साठ्यातून जिल्ह्याला तब्बल ७० हजार लसींचे डोस मिळणार आहेत. हे सर्व डोस एक किंवा दोन दिवसांत जिल्ह्यात उपलब्ध होतील. त्यात ५६ हजार डोस हे कोविशिल्डचे आणि १४ हजार डोस हे कोव्हॅक्सिनचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाला वेग मिळेल.
१ मेपासून सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले आहे. मात्र तेवढे पुरेसे डोस नसल्याने लसीकरणात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यात सध्या लसींचा साठा अपुरा असल्याने ५ मे रोजी होणारे जिल्हाभरातील ४५ आणि त्यावरील वयाच्या नागरिकांसाठीचे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी आधी नोंदणी केली आहे त्यांनाच लस देण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्याला आता ७० हजार नवे डोस मिळणार असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.