राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST2021-02-05T05:50:53+5:302021-02-05T05:50:53+5:30

जळगाव : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनकडून पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे ...

District team announced for state cross country competition | राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

जळगाव : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनकडून पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा नुकतीच मोहाडी रस्त्यावर घेण्यात आली. त्यातून जळगाव जिल्हा संघाची निवड करण्यात आली.

निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे -

१६ वर्षे दोन किलोमीटर - विशाल उत्तम धनगर (चोपडा), हितेश धनगर, १८ वर्षे दोन किलोमीटर - मयूर दीपक धनगर (चोपडा), कल्पेश नंदलाल धनगर, २० वर्षे मुले ८ किलोमीटर - विशाल विलास चव्हाण (चाळीसगाव), दिनेश किसन पाटील (पारोळा), विशाल शिवकुमार सोनवणे (चोपडा), गौरव सोमनाथ बागुल (अमळनेर), लक्ष्मण शांताराम पाटील (अमळनेर), पंकज दयोधन कोळी (अमळनेर).

पुरुष गट १० किलोमीटर - कृष्णा भगवान घाटे (जामनेर), देवेंद्र ज्ञानेश्वर हडप (जामनेर), सौरभ रतीलाल देसले (एरंडोल), हेमंत राजेंद्र शिंपी (एरंडोल), अक्षय उदय महाजन (एरंडोल).

१६ वर्षे मुली २ किलोमीटर - तनिष्का संदीप सोनवणे (पारोळा). २० वर्षे मुली - ६ किलोमीटर - आरती उगलाल भिल (अमळनेर).

यावेळी स्पर्धाप्रमुख म्हणून डॉ. विजय पाटील यांनी काम पाहिले. अनिल पठाडे, संजय मोती व मयूर वाघमारे यांच्या निवड समितीने जिल्हा संघाची निवड केली. पंच म्हणून जिल्हा पंचप्रमुख प्रा. वसीम मिर्झा, गिरीश पाटील, अनंतराव जाधव, नीलेश पाटील, सचिन महाजन, योगेश सोनवणे, गिरीश महाजन, प्रा. समीर घोडेस्वार, देवानंद पाटील, विजय विसपुते, सुनील बाविस्कर, मनोज वाघ यांनी काम पाहिले.

Web Title: District team announced for state cross country competition