भडगाव येथे एकलव्य संघटनेची जिल्हा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:24+5:302021-08-20T04:20:24+5:30

या बैठकीला जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित ...

District meeting of Eklavya Association at Bhadgaon | भडगाव येथे एकलव्य संघटनेची जिल्हा बैठक

भडगाव येथे एकलव्य संघटनेची जिल्हा बैठक

या बैठकीला जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी पवनराजे सोनवणे यांची निवड करण्यात आली.

यावेळी एकलव्य संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, युवा जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषी पवार, भडगाव तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मोरे, शहाराध्यक्ष दशरथ मोरे, तालुका सचिव सखाराम सोनवणे, यशवंतनगर शाखाध्यक्ष दिनकर सोनवणे, तालुका उपाध्यक्ष सुभाष मोरे, तालुका कार्याध्यक्ष दादाभाऊ बहिरम, चाळीसगाव तालुकाध्यक्ष नाना सोनवणे, चोपडा तालुकाध्यक्ष सुशील सोनवणे, पारोळा तालुकाध्यक्ष गणेश भिल्ल, धरणगावचे तालुकाध्यक्ष संजय पवार हजर होते.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी सांगितले की, संघटनेमार्फत चाळीसगावला २३ सप्टेंबरला पहिले अधिवेशन घेण्यात येईल. आपली ताकद या अधिवेशनात दाखवून देऊ. ज्या लोकांना घरकुल मंजूर असून जागाच नाही. प्रत्येक गावातील स्मशानभूमी नावे लावण्यात यावी. जातीचे दाखले काढून देण्यात यावे. नवीन रेशनकार्ड, यावल कार्यालय अनुदानाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी महत्त्वपूर्ण एक ठराव करण्यात आला. त्यात एकलव्य संघटनेचे पहिले अधिवेशन २३ सप्टेंबरमध्ये चाळीसगाव येथे तंट्यातात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

Web Title: District meeting of Eklavya Association at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.