निसर्ग व पर्यावरण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:54 IST2020-08-10T14:52:59+5:302020-08-10T14:54:19+5:30
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

निसर्ग व पर्यावरण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
भुसावळ, जि.जळगाव : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व राज्य कार्याध्यक्ष विलासराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम राबवून जनजागृती करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ९ रोजी क्रांतीदिनानिमित्त जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे : जिल्हाध्यक्ष नाना पाटील भुसावळ, उपाध्यक्ष राजेश पाटील मुक्ताईनगर, वैशाली पाटील भडगाव, नंदलाल पाटील चोपडा, सचिव संजय ताडेकर यावल, सहसचिव विजय लुल्हे जळगाव, माधुरी मगरे यावल, अनिता पाटील जामनेर, राकेश पाटील एरंडोल, संघटक सुरेश अहिरे भुसावळ, सहसंघटक अरुणा उदावंत पाचोरा, नयना पाटील रावेर, महेश पाटील पारोळा, माधुरी अहिरे जळगाव, कार्याध्यक्ष डॉ.जगदीश पाटील भुसावळ, खजिनदार संजीव पाटील भुसावळ, सहखजिनदार दिलीप पाटील चाळीसगाव, महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख निशांत पाटील जळगाव, कायदेशीर सल्लागार अॅड. तुषार पाटील भुसावळ, अॅड.किशोर पाटील बोदवड, अॅड.अश्विनी डोलारे भुसावळ, मार्गदर्शक सल्लागार अविनाश कुमावत जळगाव, सल्लागार सदस्य सॅम शेफर्ड जळगाव, भाऊसाहेब पाटील भडगाव, नरेंद्र मोरे धरणगाव, राहुल पाटील अमळनेर, नरेंद्र नाईक जामनेर, रवींद्र खरादे जामनेर, तज्ज्ञ मार्गदर्शक संजय पाटील चोपडा, सुरेंद्रसिंग पाटील भुसावळ, प्रसिद्धी प्रमुख उमाकांत पाटील फैजपूर अशी नियुक्ती करण्यात आली आहे.