जिल्हा बँकेच्या अमळनेर शाखेला कुलूप ठोकले
By Admin | Updated: June 1, 2017 17:29 IST2017-06-01T17:25:18+5:302017-06-01T17:29:15+5:30
कर्ज प्रक्रियेतील दिरंगाईचा निषेध म्हणून ठोकले जिल्हा बँक शाखेला कुलूप
जिल्हा बँकेच्या अमळनेर शाखेला कुलूप ठोकले
ऑनलाईन लोकमत
अमळनेर, दि.1- जून महिना सुरू झाला शेतक:यांकडून पेरणीची तयारी सुरु झाली असताना कर्ज देण्यासाठीची प्रक्रिया अपूर्ण असल्याने गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी दौलत पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील जिल्हा बँकेच्या शाखेला कुलूप ठोकले
अमळनेरमध्ये 92 विविध कार्यकारी सोसायटी आहेत. त्यापैकी 36 सोसायटी बाजार समितीत असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेला जोडल्या आहेत एकूण 8 ते 10 हजार किसान कार्ड द्यायचे आहेत. मात्र अद्याप पावेतो 700 कार्ड वाटले झाले आहेत. एक कार्ड साठी 15 मिनिटे लागत असताना त्यासाठी एकाच कर्मचा:याची नियुक्ती केली आहे. सकाळपासून शेतकरी रांगेत उभे होते. अखेर शेतक:यांच्या संयमाचा सुटला. शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी पाटील यांनी शेतक:यांसह बँकेला कुलूप लावले कर्मचारी व शेतकरी मध्ये अडकले आहेत. जिल्हा बँकेचे अधिकारी आणि संचालक येऊन योग्य निर्णय घेत नाहीत तोपयर्ंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.