जिल्हा बँकेचे नऊ संचालक निवडणुकीच्या रिंगणात होते. पैकी पाच संचालक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर चार जणांना आमदार होण्याची संधी मिळाली आहे.
जिल्हा बँकेचे चार संचालक झाले आमदार
जळगाव : जिल्हा बँकेचे नऊ संचालक निवडणुकीच्या रिंगणात होते. पैकी पाच संचालक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर चार जणांना आमदार होण्याची संधी मिळाली आहे. जिल्हा बँकेत बहुसंख्य आमदार हे संचालक होते. अर्थात बँक ही एका अर्थाने सत्ताकेंद्र बनली होती. जिल्हा बँकेतून राजकाणाची समीकरणे ठरायची. सूत्रेही हलायची. विधानसभेच्या निवडणुकीत बँकेत संचालक असलेली मातब्बर मंडळी एकमेकांसमोर होती. त्यात बँकेचे माजी चेअरमन व संचालक डॉ.सतीश पाटील आणि विद्यमान चेअरमन चिमणराव पाटील यांच्यातील लढत चर्चेत राहीली. जिल्हा बँकेचे संचालक असलेले सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, चिमणराव पाटील, डॉ.सतीश पाटील, किशोर पाटील, अनिल भाईदास पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, डी.के.पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात होते. यातील एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर), डॉ.सतीश पाटील, (एरंडोल), प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा) हे विजयी झाले आहेत. तर इतर संचालक हे पराभूत झाले आहेत. पराभूत झालेले सर्वच संचालक आपापल्या मतदारसंघात आघाडीवर राहिले. अर्थात लढत चुरशीची झाली, पण या पराभूत झालेल्या संचालकांना क्रमांक दोनवर समाधान मानावे लागले.