भुसावळ तालुक्यातील दिव्यांगांना स्वावलंबन कार्डचे वितरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:20+5:302020-12-04T04:45:20+5:30
भुसावळ : सामाजिक न्याय विभाग व कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा समाज कल्याण विभाग जि. प.अंतर्गत पंचायत ...

भुसावळ तालुक्यातील दिव्यांगांना स्वावलंबन कार्डचे वितरण सुरू
भुसावळ : सामाजिक न्याय विभाग व कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा समाज कल्याण विभाग जि. प.अंतर्गत पंचायत समिती येथे दिव्यांग व्यक्तिंसाठी सल्ला व मार्गदर्शन कक्षाद्वारे दर बुधवारी ५८ दिव्यांगांना स्वावलंबन कार्डाचे वाटप करण्यात येत आहे.
सभापती मनीषा पाटील, गटविकास अधिकारी विलास भाटकर, माजी सभापती सुनील महाजन, सहायक गटविकास अधिकारी उमेश पाटणकर , कक्ष अधिकारी कैलास काळे, कनिष्ठ शासकीय अधिकारी राजेंद्र फेगडे व कल्पना रावळ यांच्या हस्ते स्वावलंबन कार्डाचे दिव्यांग लाभार्थ्यांना २ रोजी वितरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण ५८ दिव्यांग लाभार्थ्यांना यूआयडी कार्डाचे वितरण करण्यात आले आहे. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, भाजपा तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सदानंद उन्हाळे, दिलीप वऱ्हाळे, दिव्यांग कक्षाचे परिचर कलाशिक्षक गिरीश बडगुजर व सर्व पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती. शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार विविध २१ प्रकारचे अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ होत आहे. तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना कक्ष परिचारक, कलाशिक्षक गिरीश बडगुजर दिव्यांग लाभार्थ्यांना यू.डी.आय.डी. कार्ड संदर्भात व शासन सवलती संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. ० ते ६ वर्षे वयोगटातील दिव्यांग बालकांना शीघ्र निदान व उपचार केंद्र या योजनेमार्फत विशेष शाळेबद्दल मार्गदर्शन तसेच पुनर्वसन याबाबत माहिती देण्यात येत आहे.