गुळवे विद्यालयात पोषण आहाराचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:04+5:302020-12-04T04:42:04+5:30

कडगाव येथील ग्रामसेवकांची बदली रद्द करण्याची मागणी जळगाव : तालुक्यातील कडगाव येथील ग्रामसेवक हे गावात चांगले काम करित असतांना, ...

Distribution of nutritious food in Gulve Vidyalaya | गुळवे विद्यालयात पोषण आहाराचे वाटप

गुळवे विद्यालयात पोषण आहाराचे वाटप

कडगाव येथील ग्रामसेवकांची बदली रद्द करण्याची मागणी

जळगाव : तालुक्यातील कडगाव येथील ग्रामसेवक हे गावात चांगले काम करित असतांना, त्यांची केलेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी जळगाव ग्रामीण कमिटीतर्फे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कडगावातील नागरिकांनी जळगाव येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तुषार इंगळे यांची निवड

जळगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव शहर कार्याध्यक्षपदी तुषार इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल

इंगळे यांचा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे ,कुणाल पवार, राजेश पाटील , लता मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अॅड कीर्ती पाटील यांचा सत्कार

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील भष्ट्राचाराचा पाठपुरावा करत असल्याबद्दल जिल्ह्यातील ठेवीदारांतर्फे बुधवारी कीर्ती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कीर्ती पाटील यांच्यामुळे ठेवी मिळणार असल्याचा विश्वासही या नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदा उपस्थित होते.

म्हसावद येथे आयटकची बैठक उत्साहात

जळगाव : म्हसावद उपकेंद्र येथे आशा व गट प्रवर्तक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन यांच्यासह प्रतिभा क्षिरसाठ, जनाबाई सुंभे, किरण सुर्यवंशी, मेनका चव्हाण, वैशाली धनगर, गोजर पाटील, सुनिता पवार, अनिता धनगर, मालती परदेशी, छाया मोरे, जयश्री सुर्यवंशी आदी महिला उपस्थित होत्या.

Web Title: Distribution of nutritious food in Gulve Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.