चाळीसगावला रद्दी दानातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:00+5:302021-08-17T04:23:00+5:30

शहरातील दाते तसेच देवेंद्रकुमार अहिरे यांचा परिवार आणि आनंदीबाई बंकट हायस्कूल वर्ग दहावी ९६ बॅच यांनी याकामी योगदान दिले. ...

Distribution of educational materials to students from waste donation to Chalisgaon | चाळीसगावला रद्दी दानातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चाळीसगावला रद्दी दानातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शहरातील दाते तसेच देवेंद्रकुमार अहिरे यांचा परिवार आणि आनंदीबाई बंकट हायस्कूल वर्ग दहावी ९६ बॅच यांनी याकामी योगदान दिले.

यावेळी चित्रकार धर्मराज खैरनार यांनी या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला बाबुलाल पवार, कांचन खरटमल, विजय शर्मा, खुशाल पाटील, गणेश खरटमल, भूषण ताथेड, शैलेश जैन, भूषण कोठावदे, जगन्नाथ चिंचोले, रोटरी अध्यक्ष रोशन जैन, खेमचंद कुमावत, दीपक खैरनार उपस्थित होते.

नगरपरिषद मराठी शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक निवृत्ती उंबरकर, शाळा क्र. ४ चे मुख्याध्यापक ज्ञानेश साळुंखे, दिनेश पचलुरे, शाळा क्र. १६ चे अविनाश साखरे, तसेच शाळा क्र. ४ चे शिक्षक अनिल पेटे व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of educational materials to students from waste donation to Chalisgaon