पाळधी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:46+5:302021-07-28T04:17:46+5:30
पाळधी, ता.धरणगाव : स. नं. झंवर विद्यालयात मंगळवारी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ...

पाळधी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पाळधी, ता.धरणगाव : स. नं. झंवर विद्यालयात मंगळवारी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे संजय पाटील, संजू महाजन, अमोल पाटील होते. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष सुनील झंवर होते.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका एस.व्ही. तोतला व कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतापराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मी व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे झंवर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. या विद्यालयात विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने घडविले जातात, याचा आम्हाला अभिमान आहे.
सुनील झंवर यांनी सांगितले की, आपलेही समाजाला काही देणे लागते, हा विचार डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून कृतज्ञता व्यक्त करणे हेही सोपे काम नाही.
शिक्षक विवेक भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.